Sunday, December 28, 2008

कांद्याच्या पातीची सोप्पी कोशिंबीर

कांद्याच्या पातीची ही कोशिंबीर करायला अगदी सोपी आणि पटकन होणारी अशी आहे.



साहित्य- घरात सहजी उपलब्ध असणारेच-

कांद्याची पात - १ जुडी
दाण्याचं कूट - २ - ३ चमचे
कच्चं तेल - १ चमचा
गोडा मसाला - १ छोटा चमचा
तिखट - १ छोटा चमचा
लिंबाचा रस - १ छोटा चमचा
मीठ - चवीनुसार
साखर - २ चिमूट

कृती - कांद्याची पात स्वच्छ पुसून चिरून घ्यावी. त्यात वरील सर्व जिन्नस - दाण्याचं कूट, कच्चे तेल, गोडा मसाला, तिखट, मीठ, लिंबाचा रस आणि साखर घालावे.
घरच्या सर्वांना 'चला जेवायला' अशी हाक मारून, सगळे येईपर्यंत ही कोशिंबीर ढवळून ठेवावी. :)

करायला एकदम सोप्पी आणि फोडणी वगैरेची भानगड नसल्याने पटकन होणारी.. आणि चवीलाही अतिशय छान लागते.

6 comments:

  1. करायला तरी एकदम सोपी वाटते आहे. करुन बघावी म्हणतो :). पुढील लेखनास/पाककृतींसाठी शुभेच्छा!!

    ReplyDelete
  2. शाल्मली काकु,

    लै बेष्ट बघा. " घरच्या सर्वांना 'चला जेवायला' अशी हाक मारून, सगळे येईपर्यंत ही कोशिंबीर ढवळून ठेवावी." कस काय सुचत तुम्हांला? धन्यवाद.

    खादाड भाउ

    ReplyDelete
  3. Koshimbir mast ch ani easy to make aahe.

    ReplyDelete
  4. image baghunach tondat pani aale :))

    ReplyDelete
  5. फारच मस्त आहे कोशिंबीर ..... घरी एकटी असताना भाजी करायचा कंटाला आला तरी मस्त option आहे..

    ReplyDelete
  6. aapalyaa sarvaMchya pratisaadabaddal apalyala manapasun dhanyavaada!

    ReplyDelete