साहित्य :
टोमॅटो ४ मध्यम आकाराचे
कांदे २ मध्यम आकाराचे
आले १ इंच
लसुण पाकळ्या ४ ते ५
तिखट पाव चमचा
नारळाचा चव अर्धी वाटी
साखर आणि मीठ चवीनुसार
फोडणीसाठी -
तूप २ चमचे, जिरे, हिंग, कढीपत्त्यची ७-८ पाने, सुक्या मिर्च्या २-३ तुकडे, कोथिंबीर,
३-४ लवंगा, ३-४ काळी मिरी, दालचिनी लहानसा तुकडा, २ वेलदोडे
कृती :
टोमॅटो, कांदे यांच्या मोठ्या फोडी करुन उकडाव्यात. उकडतानाच त्यात आले, लसुण घालावे.
उकडल्यानंतर टोमॅटोची साले काढावीत.
मिक्सरच्या भांड्यात टोमॅटोचा गर, कांदे, आले, लसुण आणि नारळाचा चव घालून, त्याची पेस्ट करावी. त्यात गरजेनुसार पाणी घालावे आणि चवीनुसार साखर, मीठ, तिखट घालून मिश्रण उकळण्यास ठेवावे.
आता फोडणी करावी.
छोट्या कढल्यात तूप गरम करुन त्यात फोडणीचे साहित्य घालावे.
ती फोडणी उकळणार्या मिश्रणात एकत्र करावी आणि अजून एक उकळी काढावी.
टीप : फोडणी करतानाच त्यात कोथिंबीर घातल्यास ती हिरवी राहते.
ही पाककृती मिसळपाव या संकेतस्थळावर सुद्धा वाचता येईल.
Tuesday, December 23, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
शाल्मलीबाई,
ReplyDeleteझक्क्कास पा.कृ. आमच्या सौं. ना असे सार पा.कृ. वाचून करण्यांस सांगितले पाहीजे. बघु जमते का? नविन नविन पा.कृ. येवु द्यात.
खादाड भाउ.
( जगण्यासाठी सगळेच खातांत पण आम्ही मात्र खाण्यासाठीच जगतो )
प्रतिसादाबद्द्ल आभारी आहे.
ReplyDelete