Friday, January 23, 2009

कानडी सांबार



साहित्य :-
१ लहान वाटी तुरीची डाळ
१+१ कांदा
१ टोमॅटो
२ लहान बटाटे
अर्धी वाटी ओले खोबरे
१ लहान चमचा धने
१ लहान चमचा जिरे
२ चमचे सांबार पावडर
१ चमचा रसम् पावडर (रसम् पावडर नसल्यास सांबार पावडर त्यानुसार जास्त)
छोट्या लिंबाएवढी चिंच
चवीनुसार मीठ
फोडणीसाठी- २ चमचे तेल, मोहरी, हिंग, हळद
१ चमचा तिखट

कृती:-
तुरीची डाळ शिजवून, घोटून घ्यावी. बटाटे उकडून फोडी करून घ्याव्यात.
एक कांदा चिरून घ्यावा. चिंचेचा कोळ करून घ्यावा.
मिक्सरच्या भांड्यात एका कांद्याच्या फोडी, टोमॅटोच्या फोडी, ओले खोबरे, धने, जिरे, सांबार आणि रसम पावडर असे घालून, गरजेनुसार पाणी घालून मऊ, मुलायम पेस्ट करून घ्यावी.
एका पातेल्यात तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करावी. त्यात कांद्याच्या फोडी घालून चांगले परतून घ्यावे. त्यानंतर त्यात वाटून घेतलेली पेस्ट घालावी. थोडे परतावे. परतताना त्यात थोडे पाणी घालावे म्हणजे खाली लागणार नाही. या मिश्रणात उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घालाव्यात. चिंचेचा कोळ घालावा. त्यानंतर घोटून घेतलेली डाळ घालावी. चवीप्रमाणे मीठ आणि एक लहान चमचा तिखट घालावे.गरजेनुसार पाणी घालावे. गरज वाटल्यास वरूनही थोडा सांबार मसाला घालावा. सांबाराला खळखळून उकळी येऊ द्यावी.
गरम गरम भाताबरोबर गरमागरम सांबार वाढावे. किंवा इडल्यांबरोबर आस्वाद घ्यावा.

3 comments:

  1. शाल्मली, सांबार फारच स्वादिष्ट दिसत आहे.

    ReplyDelete
  2. फोटो जरा मोठा टाका. आनी चमचा नका ठेवू

    ReplyDelete
  3. तृप्ती,
    तुमच्या अभिप्रायाबद्दल आभार!

    नंदन,
    धन्यवाद! पुढच्या वेळेस फोटो काढताना चमच्याची सूचना जरूर लक्षात ठेवीन.

    ReplyDelete